logo

नांदेड शहर व परिसरात दोनदा भूकंपाचे धक्के

नांदेड दि.21 : शहर व अर्धापूर, बिलोली, मुदखेड, नायगाव, देगलुर या तालुक्यात आणि आजू बाजूच्या परिसरात आज दिनांक 21 मार्च रोजी सकाळी अनुक्रमे 06:09 आणि 06:19 या वेळेत भूकंपाचे भूगर्जनेसह सौम्य धक्के जाणवले. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
जिल्हा व्यवस्थापन विभागाने दिलेल्या वृत्तानुसार भूकंपाची तीव्रता रिष्टल स्केल वर अनुक्रमे 4.5 आणि 3.6 अशी नोंद झाली आहे.
भूकंपाचे केंद्र बिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी जिल्ह्यातील जांब गावात असून नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भागात याचे धक्के जाणवले.
नांदेड जिल्ह्यात या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही वित्त अथवा जीवित हानी झाल्याचे वृत्त नसून सदरील धक्के हे सौम्य स्वरूपाचे होते.

29
3434 views